VIDEO : आता, पेट्रोलवर चालणारी कार पाण्यावरही चालणार!

महागाईच्या या दिवसांत तुम्हाला पाण्यावर चालणारी कार मिळाली तर... देसी निर्मात्याच्या संकल्पनेतून असं एक पाण्याच्या साहाय्यानं बनलेलं 'देसी इंधन' तयार झालीय खरं...

Updated: Jan 9, 2016, 12:25 PM IST
VIDEO : आता, पेट्रोलवर चालणारी कार पाण्यावरही चालणार! title=

नवी दिल्ली : महागाईच्या या दिवसांत तुम्हाला पाण्यावर चालणारी कार मिळाली तर... देसी निर्मात्याच्या संकल्पनेतून असं एक पाण्याच्या साहाय्यानं बनलेलं 'देसी इंधन' तयार झालीय खरं...

मध्यप्रदेशच्या मोहम्मद रईस यांनी पाण्याच्या माध्यमातून एक इंधन तयार केलंय. त्यामुळे, पेट्रोलवर चालणारी कोणतीही कार या अनोख्या तंत्रज्ञानानं पाण्यावर चालू शकणार आहे. रईस आपल्या या अनोख्या आयडियाचं पेटंट बनवणार आहेत.