भारताचा ‘निर्भय’, पण पाकिस्तानला भय!

भारताचं पहिलं ‘सबसॉनिक आण्विक क्षेपणास्त्र’... निर्भय… या क्रूझ क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी पार पडलीय. 

Updated: Oct 17, 2014, 03:50 PM IST
 भारताचा ‘निर्भय’, पण पाकिस्तानला भय! title=

बालेश्वर, ओडिसा : भारताचं पहिलं ‘सबसॉनिक आण्विक क्षेपणास्त्र’... निर्भय… या क्रूझ क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी पार पडलीय. 

शुक्रवारी सकाळी १० वाजून ३ मिनिटांनी चांदीपूर परीक्षण रेंजमधून या क्षेपणास्त्राचं यशस्वीरित्या परीक्षण करण्यात आलं. ७०० किलोमीटरहून अधिक दूर असणाऱ्या लक्ष्याला या मिसाईलद्वारे लक्ष्य बनविलं जाऊ शकतं. ही मिसाईल १००० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. म्हणजेच, संपूर्ण पाकिस्तानदेखील आता या मिसाईलच्या टप्प्यात आलाय.

‘डीआरडीओ’नं डिझाईन केलेल्या या क्षेपणास्त्राद्वारे हजार किलोमीटरपर्यंत दूर असलेल्या लक्षाचा अचूक वेध घेता येणं शक्य होणार आहे. जगातील कोणत्याही रडार तसंच हायटेक एअर डिफेंस सिस्टीमला चकवा देण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. 

जमीन, समुद्र आणि हवा अशा तीनही ठिकाणांवरून मोबाईल मिसाईल लॉन्चरच्या सहाय्यानं या क्षेपणास्त्राचा मारा करता येऊ शकतो. एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर तीच्यावर कंट्रोल करता येतो आणि तिला हव्या त्या दिशेनं वळवून लक्ष्यावर अचूक मारा करता येणं, या क्षेपणास्त्राद्वारे शक्य आहेत. 

जगातील अमेरिका, रशिया, चीन, अशा काही मोजक्या देशांकडे लांब पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्रं आहेत. त्याद्वारे दोन हजार किलोमीटरपर्यंत दूर लक्ष्याचा वेध घेणं शक्य आहे. 

‘निर्भय’ची वैशिष्ट्ये...

* रेंज - ८०० ते १००० किमी 
* लांबी - ६ मीटर 
* व्यास – ०.५२ मीटर
* वजन - १५०० किलोग्रॅम 
* वेग – ०.७ मॅच 
* उत्पादन मूल्य - १० कोटी प्रति मिसाईल
* निर्माण - एडीई बंगळुरू

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.