ऑगस्टा खरेदी: संरक्षण मंत्रालयावर कॅगचे ताशेरे

३५०० कोटी रुपये खर्चून व्हीव्हीआयपींसाठी खरेदी करण्यात आलेलं ओगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरच्या खरेदीमध्ये दलाली खाल्याच्या आरोपाबाबतचा अहवाल आज कॅगनं संसदेत सादर केला. कॅगनं सादर केलेल्या अहवालात ओगस्टा खरेदीमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत संरक्षण मंत्रालयाला दोषी ठरवत, खरेदीमध्ये अनेक त्रूटी असल्यानं संरक्षण मंत्रालयावर ताशेरेही ओढले आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 14, 2013, 07:37 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
३५०० कोटी रुपये खर्चून व्हीव्हीआयपींसाठी खरेदी करण्यात आलेलं ऑगस्टा वेटलँड हेलिकॉप्टरच्या खरेदीमध्ये दलाली खाल्याच्या आरोपाबाबतचा अहवाल आज कॅगनं संसदेत सादर केला. कॅगनं सादर केलेल्या अहवालात ओगस्टा खरेदीमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत संरक्षण मंत्रालयाला दोषी ठरवत, खरेदीमध्ये अनेक त्रूटी असल्यानं संरक्षण मंत्रालयावर ताशेरेही ओढले आहेत.
ऑगस्टा वेटलँडच्या AW-१०१ हेलिकॉप्टरची ट्रायल त्यासारख्याच एका डमी हेलिकॉप्टरवर केली गेली, असं संसदेत सादर झालेल्या रिपोर्टमध्ये कॅगनं म्हटलंय. कारण ही ट्रायल झाली तेव्हा ऑगस्टा वेटलँड AW-१०१ हेलिकॉप्टर तयार होत होतं. या ट्रायलमुळं टेंडरमध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या इतर दोन विक्रेत्यांना संधी मिळाली नाही, असंही कॅगन आपल्या अहवालात नमूद केलंय.
सोबतच डीपीपीद्वारं २००६ मध्ये हेलिकॉप्टर खरेदी संबंधी ज्या गाईडलाईन्स निश्चित केल्या आहेत. त्यांचं पालन या खरेदीत झालं नसल्याचं पुढं आलंय. ऑगस्टा हेलिकॉप्टरच्या खरेदीची किंमत ४८७१.५ कोटी रुपये निश्चित केल्या गेली, जी की खूप जास्त आहे. शिवाय AW- १०१ हेलिकॉप्टरचा २००२ मध्ये विचार करण्यात आला नव्हता. कारण हे हेलिकॉप्टर ४५७२ मीटर उंचीपर्यंत उडू शकत होतं. जेव्हा की, ६००० मीटर उंचीपर्यंत उडणाऱ्या हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.