अरविंद केजरीवाल `एक खोटारडा रेडिओ`

दिल्लीतील ओखला मतदारसंघाचे आमदार आसिफ मोहम्मद खान यांनी गुरूवारी केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. केजरीवाल हा एक खोटारडा रेडियो असल्याचंही आसिफ यांनी म्हटलंय.

Updated: Jan 30, 2014, 02:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली
दिल्लीतील ओखला मतदारसंघाचे आमदार आसिफ मोहम्मद खान यांनी गुरूवारी केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. केजरीवाल हा एक खोटारडा रेडियो असल्याचंही आसिफ यांनी म्हटलंय.
या गोंधळानंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद रद्द केली आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदीया यांच्यासह पत्रकार परिषदेतून बाहेर पडले.
काँग्रेस आमदार आसिफ मोहम्मद यावेळेस आक्रमक दिसून आले, त्यांनी बाटला हाऊस एन्काऊंटरची एसआयटी चौकशीची मागणी केली. मला निलंबित केलं तरी चालेल, पण मी आपच्या बाजून मतदान करणार नाही, मी माझं समर्थन परत घेत आहे.
काँग्रेसने आपल्याला पक्षातून काढून टाकलं, तरी त्याची आपल्याला पर्वा नसल्याचंही आसिफ यांनी संगितलं, ही सरकार खोटारडं आहे, फक्त खोटं बोलत असतं, असंही आमदार आसिफ यांनी आपच्या नेत्यांना सुनावलं आहे.
आप सरकार मुसलमानांशी भेदभाव करतंय, जर शीख दंगलींची एसआयटी चौकशी होऊ शकते, तर बाटला हाऊस एन्काऊंटरची का नाही, असा सवालही यावेळी आमदार आसिफ यांनी उपस्थित केला आहे.
केजरीवाल यांनी या आधी पत्रकार परिषदेत, आपल्या एका महिन्याच्या कामाचा आढावा दिला, भ्रष्टाचार, व्हीआयपी कल्चर, वीजपाणी या आपल्या आश्वासनांवर काम केल्याचं केजरीवाल यांनी मीडियाला सांगितलं.
जनलोकपाल बील उद्या दिल्ली कॅबिनेटसमोर ठेवण्यात येईल, तसेच हे विधेयक पुढील १५ ते २० दिवसांत विधानसभेतही पास होईल, अशी आपल्याला अपेक्षा असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.