धावत्या लक्झरी कारमधून जेव्हा नोटा उडू लागल्या...

रस्त्यावरून भरधाव वेगात एक लग्झरी कार धावतेय... आणि गाडीतून हवेत आणि रस्त्यावर पैशांचा पाऊस पडतोय... असंच दृश्य मंगळवारी गोंडा-लखनऊ राजमार्गावर पाहायला मिळालं. 

Updated: Jun 10, 2015, 12:42 PM IST
धावत्या लक्झरी कारमधून जेव्हा नोटा उडू लागल्या...  title=

गोंडा, उत्तरप्रदेश : रस्त्यावरून भरधाव वेगात एक लग्झरी कार धावतेय... आणि गाडीतून हवेत आणि रस्त्यावर पैशांचा पाऊस पडतोय... असंच दृश्य मंगळवारी गोंडा-लखनऊ राजमार्गावर पाहायला मिळालं. 

बटौरा बख्तावर सिंह गावाजवळ हे दृश्य प्रत्यक्षात पाहायला मिळालं. जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत गाडीतून नोटा उधळल्या जात होत्या आणि या नोटा मिळवण्यासाठी काही गावकरी गाडीच्या मागे धावत होते. 

गाडीतून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचे बंडल पडताना पाहून गावकरी बेभान झाले होते. त्यामुळेच पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांनीही आपल्या गाड्या रस्त्यावरच थांबवून या नोटा उचलण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली. 

उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, सुस्साट सुटलेल्या हवेमुळे गाडीतून नोटा उडत होत्या. याबद्दल सूचना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अनेक स्थानांवर वाहनांची चेकिंग सुरू केली. पण एव्हाना नोटा उडवणारी लक्झरी कार मात्र गायब झाली होती. 

या प्रकरणात पोलिसांच्या हाती कोणताही पुरावा लागलेला नाही. ना कुणी या प्रकरणाची तक्रार केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.