पाटणा : 'बिहार@२०२५' या लक्ष्यवेधी मोहिमेची सुरवात नितीशकुमार सरकारने केली आहे.
बिहारच्या पुढील १० वर्षाच्या विकासाचं हे व्हिजन डॉक्युमेंट आहे, ते बिहारमधील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. यासाठी 'बिहार@2025' या मोहिमेची सुरवात करण्यात आली.
या मोहिमेमुळे लोकांना त्यांची मते मांडता येतील, तसेच त्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोचवता येतील. आरोग्य, वीज, शिक्षण, रोजगार आणि अशा विविध क्षेत्रांत लोकांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे कळण्यासही याद्वारे मदत होईल.
यंत्रणा पूर्णत: अद्ययावत करण्यासाठी बिहारमध्ये राहत नसलेल्या लोकांकडून, तसेच तज्ज्ञांकडूनही मते मागविली जाणार आहेत.
नितीशकुमार यांनी जगातील सर्वांत मोठ्या मोहिमेची सुरवात केली आहे, यातून ४ कोटी लोकांपर्यंत पोचण्याचा सरकारचा मानस आहे. यामध्ये राज्यातील ४० हजार गावे, तसेच १० हजार सरकारी आणि नागरी सोसायट्यांमधील सभासदांचा समावेश आहे.
येत्या आठ ते १० आठवड्यांत या सर्वांपर्यंत पोचण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.