`मुलींना मोबाइल वापरू देऊ नयेतः बसप

मुलींना मोबाइल वापरू देऊ नयेत, असं वक्तव्य करून बहुजन समाजवादी पार्टीचे खासदार राजपाल सैनी यांनी रविवारी वादाला तोंड फोडलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 22, 2012, 03:38 PM IST

www.24taas.com, मुझफ्फरनगर
मुलींना मोबाइल वापरू देऊ नयेत, असं वक्तव्य करून बहुजन समाजवादी पार्टीचे खासदार राजपाल सैनी यांनी रविवारी वादाला तोंड फोडलं आहे.
तालिबानी पद्धतीची विचारसरणीचं द्योतक असणाऱ्या सैनी यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं, “मुलांना मोबाइल फोन देऊ नका... विशेषतः मुलींना. आणि जर ते मोबाइल वापरत असतील, तर त्यांचे मोबाइल जप्त करा. मा माझ्या प्रत्येक भाषणात हेच सांगतो.” यापुढे जाऊन त्यांनी सवाल केला “मोबाइल नसला तर काय नुकसान होणार आहे मुलींचं? आपल्या आया, बहिणींकडे पूर्वी मोबाइल नव्हते, मोबाइल नव्हता म्हणून काही त्या मेल्या नाहीत.”
या संदर्भात आपलं विचार स्पष्ट करताना त्यांनी त्यांच्याकडे मदत मागायला आलेल्या माणसाचा किस्सा सांगितला. त्या माणसाची मुलगी पळून गेली होती. याबद्दल सैनींनी मोबाइलला जबाबदार धरलं. सैनींच्या या विचारधारणेवर विविध स्तरातील लोक टीका करत आहेत.