बीएसएनएस ब्रॉ़डबॅण्ड, लँडलाईन मासिक शुल्कात वाढ

देशातील सर्वात मोठी दूरध्वनी कंपनी भारत संचार निगम अर्थात बीएसएनएल आजपासून आपल्या लँडलाइन आणि ब्रॉडबँडच्या मासिक सेवा शुल्कात वाढ करणार आहे.

Updated: Mar 2, 2014, 12:02 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देशातील सर्वात मोठी दूरध्वनी कंपनी भारत संचार निगम अर्थात बीएसएनएल आजपासून आपल्या लँडलाइन आणि ब्रॉडबँडच्या मासिक सेवा शुल्कात वाढ करणार आहे.
बीएसएनएलचे कोलकाताचे मुख्य महाप्रबंधक गौतम चक्रवर्ती यांनी ही माहिती दिली आहे.
चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार लँडलाईनच्या वन इंडिया मासिक योजनेसाठी आता १८० रूपयांऐवजी १५ रूपये द्यावे लागतील.
या पद्धतीने ब्राँड बॅण्डच्याही मासिक शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. ही वाढ २४ रूपयांपासून ३५० रूपयांपर्यंत असेल.
ब्रॉडबॅण्डची २५० रूपयांची योजना आता २७५ रूपये आहे, ६०० रूपयांची योजना ६३० रूपये, तर ४०० रूपयांची योजना ४२४ रूपये करण्यात आली आहे. काही अन्य योजनांच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.