श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. आर.एस.पूरा सेक्टरच्या अरनिया भागात पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. यांत तीन नागरिक जखमी झालेत.
गेल्या सहा महिन्याच्या काळात पाकिस्ताननं वारंवार शस्त्रसंधींचं उल्लघन केलंय. पाकीस्तान सैन्याच्या गोळीबाराला भारतीय सैन्यानंही चोख प्रत्युत्तर दिलंय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यादरम्यान अमेरिकेनं पाकिस्तानला दहशतवादी कारवाया रोखण्याची तंबी दिली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.