गोव्यात तालिबानी प्रकार, चोरीच्या आरोपात मुलांची नग्न धिंड

गोव्यातल्या कुडचडे इथं धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. इथल्या दोन मुलांना ‘काब दे रामा’ इथं नेवून (गावाचे नाव आहे ) चोरीच्या संशयावरुन अमानुष मारहाण केल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ माजलीय. याबाबत स्वयंसेवी संस्थांनी आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवत एकाला अटक केलीय, तर अन्य तीन आरोपी फरार आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 2, 2014, 12:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पणजी/गोवा
गोव्यातल्या कुडचडे इथं धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. इथल्या दोन मुलांना ‘काब दे रामा’ इथं नेवून (गावाचे नाव आहे ) चोरीच्या संशयावरुन अमानुष मारहाण केल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ माजलीय. याबाबत स्वयंसेवी संस्थांनी आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवत एकाला अटक केलीय, तर अन्य तीन आरोपी फरार आहेत.
पार्क केलेल्या गाडीतून पेट्रोल चोरलं असा संशय घेऊन गोव्यातल्या कुडचडे इथल्या दोन मुलांना दक्षिण गोव्यातील ‘काब दे रामा’ इथं काही तरुणांनी नेलं. तिथं नेऊन त्यांचे कपडे काढून गावातून धिंड काढली शिवाय त्यांना गाडीच्या मागे बांधून अमानुष मारहाण करत फरफटत नेलं.
एवढ्यावरच हे तरूण थांबले नाही तर त्याची मोबाईल क्लिप काढून तीही प्रसारित केली. ही घटना इतकी अमानवी आणि क्रूर होती, की पहाणाऱ्यांचाही थरकाप उडेल. याबाबत बायलांचो साद स्वयंसेवी संस्थांनी आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवत राजेश पागी नावाच्या तरुणाला अटक करण्यात आलीय.
तर फिरोजखान, शैकीफ आणि निखिल नाईक हे तीन आरोपी फरार आहेत. त्यांच्यावर 341, 363, 323, 355, 504 या कलमानुसार धमकी देणं, मारहाण करणं, अपहरण करणं असे गुन्हे नोंदविण्यात आलेत लवकरच सर्वांना अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.