www.24taas.com, झी मीडिया, हैदराबाद
देशात तेलंगणा या 29 व्या राज्याचा जन्म झालाय. या ऐतिहासिक क्षणी हैदराबादमध्ये तेलंगणावासियांनी जोरदार जल्लोष केला. ठिकठिकाणी फटाके फोडून, आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मिठाई आणि बिर्याणीचं वाटप करण्यात आलं.
या निमित्तानं तेलंगणा राष्ट्र समिती पार्टीनं संपूर्ण हैदराबाद शहराला गुलाबी रंगानं सजवलंय. टीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात सरकारचा शपथविधी होईल. तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून के.चंद्रशेखर राव यांना राज्यपाल ईएसएल नरसिम्हन पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलीय.
नरसिम्हन हे तेलंगणा आणि उर्वरित आंध्र प्रदेशचे राज्यपाल असतील. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर के. चंद्रशेखर राव स्थानिक परेड मैदानात तेलंगणा स्थापना दिवसाच्या सोहळ्यात सामील होतील.
तेलंगणा राज्याचा जन्म… हैदराबादचा रोल
हैदराबाद तेलंगणाच्या वाट्याला
तेलंगणाची राजधानी हैदराबाद
१0-10वर्षासाठी तेलंगणा, आंध्रची राजधानी असेल हैदराबाद
सगळ्यात मोठं शहर हैदराबाद
40 टक्के महसूल तेलंगणाला हैदराबादपासून मिळणार
आयटी आणि औषध कंपन्यांचं केंद्र आहे हैदराबाद
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.