पंतप्रधान मोदींसाठी नवीन विमानांची तयारी...

देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतीच्या व्हीव्हीआयपी उड्डाणासाठी 'जम्बो जोट' लवकरच भूतकाळात जमा होऊ शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत बोईंग 777-300 एक्सटेन्डेड रेंज (ईआर) या विमानांना व्हीव्हीआयपी हवाई ताफ्यात सामील करण्याच्या तयारीत आहे. 

Updated: Feb 2, 2015, 05:17 PM IST
पंतप्रधान मोदींसाठी नवीन विमानांची तयारी... title=

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतीच्या व्हीव्हीआयपी उड्डाणासाठी 'जम्बो जोट' लवकरच भूतकाळात जमा होऊ शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत बोईंग 777-300 एक्सटेन्डेड रेंज (ईआर) या विमानांना व्हीव्हीआयपी हवाई ताफ्यात सामील करण्याच्या तयारीत आहे. 

परदेशी दौऱ्यांसाठी आत्तापर्यंकत व्हीव्हीआयपी एअरक्राफ्ट म्हणून जम्बो जेटचा वापर केला जात होतोय. एअर इंडियाच्या ताफ्यात 'बी 747' सारखी पाच विमान आहेत. उल्लेखनीय म्हणजे ही विमानं 25 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत.

'टाईम्स ऑफ इंडिया' या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, 'बी - 777 - 300 ईआर'ला नव्या व्हीव्हीआयपी एअरक्राफ्ट म्हणून सहभागी करून घेतलं जाऊ शकतं. एअर इंडिया मोठ्या काळापासून अशा विमानांचा वापर करत आहे. त्यामुळेच, त्यांच्याकडे या विमानांची तांत्रिक आणि मेन्टेनन्सची माहिती आहे. कंपनीजवळ अशा विमानांसाठी भारतातील सर्वात कर्तबगार पायलटही आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, सध्या दूरवरचा प्रवास साध्य करण्यासाठी एअर इंडिया 'बी- 777- 300 ईआर' या विमानांचा वापर करत आहे. उत्तर अमेरिकेसाठी नॉन स्टॉप उड्डाणासाठी याच पद्धतीच्या विमान मॉडलचा वापर केला जातो. बोईंगच्या या मॉडेलमध्येदोन जेट इंजिन आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.