भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची मोदींची छाप

भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा करण्याती आली आहे. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या घरी बैठक झाली. यावेळी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. उपाध्यक्षपदी उमा भारती यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारीणीत गुरजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची छाप दिसून येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 31, 2013, 12:48 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा करण्याती आली आहे. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या घरी बैठक झाली. यावेळी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. उपाध्यक्षपदी उमा भारती यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारीणीत गुरजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची छाप दिसून येत आहे.
पक्षाच्या संसदीय मंडळात गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महासचिवपदी वरुण गांधी आणि मोदी यांचे कट्टर समर्थक अमित शहा यांची नियुक्ती करण्यात आली.

महासचिव अमित शाह, अनंत कुमार, थावर चंद गहलोत, रामलाल, वरुण गांधी, राजीव प्रताप रूढी, जेपी नड्डा यांची निवड कऱण्यात आली. तब्बल सव्वा दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. २०१४ च्या निवडणुकीसाठी ही टीम आता काम करणार आहे.