www.24taas.com, नवी दिल्ली
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या नावाची उद्या घोषणा होणार आहे. आज यासंदर्भात दिल्लीत राजनाथ सिंह यांच्या घरी एक बैठक पार पडली. या बैठकीला रामलाल आणि नितीन गडकरी हे उपस्थित होते.
आज भाजप प्रदेशाध्यक्षाच्या पदावरुन दिल्लीत एक महत्त्वाची बैठक राजनाथ सिंह यांच्या घरी पार पडली. या बैठकीला रामलाल आणि नितीन गडकरी हे उपस्थित होते.
भाजप प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याचा वाद दिल्लीतून महाराष्ट्रात आणि आता महाराष्ट्रातून दिल्लीत पोहोचला. विदर्भातल्या सुधीर मुनगंटीवार यांना नितीन गडकरींचं पाठबळ असलं तरी गोपीनाथ मुंडेंनी मात्र त्यांच्या नावाला टोकाचा विरोध केलाय. मुनगंटीवारांची निवड झाल्यास प्रसंगी निर्णायक भूमिका घेण्याचा इशारा मुंडेंनी दिल्याचं भाजपकडून सूत्रांकडून समजतय.