नवी दिल्ली : दिल्लीत भाजपला सरकार स्थापन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपतीना केल्यानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रपतींनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सल्ला मागितलाय.
सूत्रांच्या माहितीनुसार गृहमंत्रालयानंही सत्ता स्थापण्याबाबत हिरवा कंदील दिलाय. त्यामुळे दिल्लीत राजकीय वातावरण गरम आहे. काँग्रेसनं मात्र दिल्लीत पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केलीय. भाजपमध्ये निवडणूक लढवून सत्ता स्थापनेची हिंमत नसल्यामुळेच ते मागील दरवाज्यातून सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आपनं केलाय.
तर सत्ता स्थापनेचं निमंत्रण मिळाल्यास भाजप त्याचा विचार करेल, अशी प्रतिक्रिया दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी म्हटलंय. मात्र निवडणुका जाहीर झाल्या तरी आम्ही लढण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
दरम्यान, आम आदमी पार्टीचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटणार आहे. त्यानंतर ते उपराज्यपाल नजीब जंग यांना विनंती करणार आहे की, भाजपला सरकार बनविण्यासाठी बोलवू नका.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.