'पक्षांना आहे उडण्याचा अधिकार, पिंजऱ्यात बंद केलं जाणार नाही '- HC

दिल्लीत पक्षाना आता गगनभरारी घेण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय देत सांगितले की, पक्षांनाही मूलभूत अधिकार असतात, त्यांचं हनन करणं योग्य नाही.

Updated: May 17, 2015, 04:43 PM IST
'पक्षांना आहे उडण्याचा अधिकार, पिंजऱ्यात बंद केलं जाणार नाही '- HC title=

नवी दिल्ली: दिल्लीत पक्षाना आता गगनभरारी घेण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय देत सांगितले की, पक्षांनाही मूलभूत अधिकार असतात, त्यांचं हनन करणं योग्य नाही.

न्यायालयाने सांगितले की, पक्षांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तसेच पक्षांना आकाशात उडण्याचं स्वातंत्र असायाला हवं, त्यांना पिंजऱ्यात कैद करून त्यांच्यावर अत्याचार केला जाऊ शकत नाही. पक्षांचा व्यापार करणे हे  त्यांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. 

जस्टिस मनमोहन सिंह यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, पक्षांना बेकायदेशीररित्या विदेशातही पाठवलं जातं. पक्षांचे अधिकार हिसकावून घेण्याचे कोणतेही अधिकार मनुष्यांना नाहीत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.