चालत्या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली चिमणी अन्...

पाटण्याहून दिल्लीला येणाऱ्या ‘गो एअर’च्या प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचलाय... हे विमान हवेत उड्डाण भरण्यापूर्वीच एक चिमणी या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली होती... वेळीच ही गोष्ट लक्षात आल्यानं विमानाचं ‘टेक ऑफ’ थांबवण्यात आलं. 

Updated: Oct 15, 2014, 02:50 PM IST
चालत्या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली चिमणी अन्...  title=

पाटणा : पाटण्याहून दिल्लीला येणाऱ्या ‘गो एअर’च्या प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचलाय... हे विमान हवेत उड्डाण भरण्यापूर्वीच एक चिमणी या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली होती... वेळीच ही गोष्ट लक्षात आल्यानं विमानाचं ‘टेक ऑफ’ थांबवण्यात आलं. 

विमानातून प्रवास करत असलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडे आठ वाजता पाटण्याच्या जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ही घटना घडली... ज्यावेळी रनवे वर या विमानानं उड्डाण घेण्यासाठी धाव घेतली त्याचवेळी एक चिमणी या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली. 

त्यामुळे, एक वेगळा आवाज आल्याचं पायलटच्या लक्षात आलं... काही ठिणग्याही उडाल्याचं त्यानं पाहिलं... त्यामुळे सतर्क झालेल्या पायलटनं लागलीच धोका ओळखला आणि एमर्जन्सी ब्रेक लावला. त्यामुळे विमान घसरतच रनवेवर शेवटी जाऊन उभं राहीलं.

लगेचच घटनास्थळावर फायर इंजिन, अॅम्ब्युलन्स वगैरे बोलावण्यात आलं. परंतु, धोका वेळीच टळल्यानं प्रवाशांना याची गरज लागली नाही. 

त्यानंतर इंजिनिअर्सनं विमानाची पडताळणी केली. इंजिनच्या वरच्या भागाची साफसफाई केली. यामुळे विमानानं तब्बल दीड तास उशिरानं पुन्हा उड्डाण घेतलं आणि दुपारी जवळपास साडे बाराच्या दरम्यान हे विमान दिल्लीला पोहचलं. याबद्दल प्रवाशांनी पायलट आणि क्रू मेंम्बर्सचे आभार मानलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.