व्हॉटस्अपमुळे खतरनाक पद्धतीने बाइक चालविणारं जोडपे अटकेत

 नियमांना पायंदळी तुडवत खतरनाक पद्धतीने बाइक चालविण्याची हौस  एका जोडप्याला खूप महागात पडली. या जोडप्याचे धोकादायक रित्या बाइक चालविण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यांना दंडही ठोठावला. 

Updated: Mar 23, 2015, 07:13 PM IST
 व्हॉटस्अपमुळे खतरनाक पद्धतीने बाइक चालविणारं जोडपे अटकेत title=
सौजन्य - फेसबूक

गोवा :  नियमांना पायंदळी तुडवत खतरनाक पद्धतीने बाइक चालविण्याची हौस  एका जोडप्याला खूप महागात पडली. या जोडप्याचे धोकादायक रित्या बाइक चालविण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यांना दंडही ठोठावला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे जोडपे मध्य प्रदेशातील असून पणजीच्या एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. 

पोलिसांनी त्यांना धोकादायक पद्धतीने बाइक चालविण्याप्रकरणी १००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबूक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोडप्याचे फोटो टाकण्यात आले. पुरूष बाइक चावत असून त्याची साथीदार महिला मोटारसायकलीच्या टाकीवर झोपली आहे. 

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की आम्ही या बाइकच्या क्रमांकावरून या दाम्पत्यांला अटक केली आहे. बाइकचा क्रमांक फेसबूक आणि व्हॉटस्अपवरील फोटोंमध्ये दिसत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.