समोसा खात असाल तर तुम्ही चैन करताय!

पटना : बिहारमध्ये समोसा खायचा असल्यास आता कर भरावा लागणार आहे....

Updated: Jan 14, 2016, 12:50 PM IST
समोसा खात असाल तर तुम्ही चैन करताय! title=
प्रातिनिधीक फोटो

पटना : बिहारमध्ये समोसा खायचा असल्यास आता कर भरावा लागणार आहे.... होय, तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे.



काही दिवसांपूर्वीच बिहार सरकारने राज्यात १ एप्रिलपासून दारुबंदीचा निर्णय लागू केला आहे. यामुळे सरकारला दारुमधून मिळणारा कोट्यावधींचा महसूल आता बुडणार आहे. म्हणूनच आता सरकारने चक्क समोसा आणि कचोरी सारख्या पदार्थांवर १३.५% इतका कर लावायचा निर्णय घेतलाय.

 



यावर स्पष्टीकरण देताना, चैनीच्या गोष्टींवर व ५०० रुपये प्रती किलोपेक्षा महाग वस्तूंवर कर लावायचा निर्णय घेतल्याचं बिहार सरकारचं म्हटलंय. 



पण, विरोधकांनी मात्र या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. समोसा आणि कचोरी ह्या चैनीच्या वस्तू नसून गरीबांचं खाणं आहे; त्यामुळे हा गरीबांवर अन्याय आहे, असं त्यांचं म्हणणं आहे



कर लागणाऱ्या वस्तुंच्या यादीत साड्या, इन्व्हर्टर, वाळू, ऑटोमोबाईलचे सुट्टे भाग यांचाही समावेश आहे.