सोने दरात मोठी घसरण, पुढील १ महिन्यात हा असेल दर

नोटबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी आपला पैसा सोन्यात गुंतवला. मात्र, त्यांच्यासाठी वाईट दिवस सुरु झाले आहेत. ८ नोव्हेंबरनंतर सोने दरात सातत्याने घसरण दिसून येत आहे. पुढील १ महिन्यात सोने दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

Updated: Dec 10, 2016, 11:37 PM IST
सोने दरात मोठी घसरण, पुढील १ महिन्यात हा असेल दर

नवी दिल्ली : नोटबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी आपला पैसा सोन्यात गुंतवला. मात्र, त्यांच्यासाठी वाईट दिवस सुरु झाले आहेत. ८ नोव्हेंबरनंतर सोने दरात सातत्याने घसरण दिसून येत आहे. पुढील १ महिन्यात सोने दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

८ नोव्हेंबरपासून आतापर्य़ंत ३१७० रुपये प्रति तोळा सोने स्वस्त झाले आहे. तर याच दरम्यान, चांदी २५०० रुपये प्रति किलो घसरली आहे. देशात कॅश क्रायसिस असून पुढील एक महिन्यात यात सुधारणा झाली नाही तर सोने दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. सोने प्रति तोळा (१० ग्रॅम) २६ हजार रुपयांवर येऊ शकते.

- नोटबंदीनंतर सोने दरात ३१७० रुपये घट झालेली दिसून येत आहे. तर चांदी दरात २२५० रुपये झाली.

- ८ नोव्हेंबरला सोने दर ३१,७५० रुपये प्रति तोळा होता. ते दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबरला २८,५८० रुपये झाला.

- याचे कारण म्हणजे सध्या कॅश उपलब्ध होत नाही. नोटांची टंचाई कायम आहे. त्यामुळे लोकांकडे पैसे हातात आले नाही तर सोने मागणीत घट होईल. याचा परिणाम हा सोने किमतीवर होईल. त्यामुळे सोने पुढील महिन्यात स्वस्त होण्याची शक्यता आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x