माजी हवाईदल प्रमुखांना चार दिवसांची सीबीआय कोठडी

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले भारतीय हवाईदलाचे निवृत्त एअर चिफ मार्शल एस.पी. त्यागी यांच्यासह तीन आरोपींना 14 डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

Updated: Dec 10, 2016, 10:20 PM IST
माजी हवाईदल प्रमुखांना चार दिवसांची सीबीआय कोठडी title=

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले भारतीय हवाईदलाचे निवृत्त एअर चिफ मार्शल एस.पी. त्यागी यांच्यासह तीन आरोपींना 14 डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

शुक्रवारी चौकशीनंतर एस.पी. त्यागी, त्यांचे भाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांनी सीबीआयनं अटक केली होती. या तिन्ही संशयित आरोपींना पतियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सीबीआयने या तिन्ही आरोपींच्या कोठडीची मागणी केली होती. हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात छत्तीसशे कोटींची लाच घेऊन व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.