भारतामुळे पाकिस्तानला येणार अच्छे दिन!

Updated: Dec 9, 2014, 06:57 PM IST
भारतामुळे पाकिस्तानला येणार अच्छे दिन! title=

 

पेशावर : भारत आणि महागाई हे समीकरण जरी न सुटणारे असले तरी भारतामुळं इतरांची महागाई मात्र दूर झाली आहे. भारतातील भाज्यांमुळे पाकिस्तानातील कॉमन मॅनला अच्छे दिन आले आहेत. भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या भाज्यांमुळं पाकिस्तानातील महागाईची समस्या दूर झाली आहे.

पाकिस्तानीतील भाजी बाजारात यापूर्वी चीनमधील भाज्या आयात केल्या जात असत. परंतु आता भारतातून भाज्या आयातीचं प्रमाण वाढल्यामुळं पाकमधील भाजी बाजारात महागाईला आळा बसला आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात टॉमेटो आणि मटारची पाकिस्तानात निर्यात केली जाते. पाकिस्तानात मटारची गोणी ३००० रूपयांत मिळायची परंतु आता ती १२०० रूपयांत मिळते. हीच अवस्था टॉमेटोची देखील आहे. पूर्वी पाकिस्तानात ७०० रूपयांत २२ किलो टॉमेटो मिळायचे परंतु आता २०० रुपयांत १२ किलो टॉमेटो मिळतात.

पाकिस्तानातील काबुल आणि पेशावर या बाजारापेठांमध्ये या भाज्यांची आयात केली जात आहे. भारतातील स्वस्त भाज्यांच्या फटका मात्र पाकिस्तानातील शेतकऱ्यांना बसला आहे आणि त्यांच्यामध्ये नारजी व्यक्त केली जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.