मुंबई : बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिलीय. 5 डिसेंबरला बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.
त्यामुळं महाराष्ट्रासह गोवा, गुजरातमधील बँका बंद राहणार आहेत. यामध्ये जवळपास 35 हजार शाखा पूर्णत: बंद राहतील. या संपात राष्ट्रीयकृत, खाजगी आणि परदेशी बँकांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं' या संपासाठी हाक दिलीय. कर्मचारी 23 टक्के वेतनवाढीच्या मागणीवर ठाम आहेत तर इंडियन बँक असोशियन 11 टक्के वेतनवाढ देण्यासाठी राजी झालेत. याच मागणीसाठी पुन्हा एकदा संप पुकारण्यात आलाय.
यापूर्वी 12 नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतातील बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळं शुक्रवारी राज्यातील जनतेला अडचणींचा सामना करावा लागणारा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.