'त्या' अभिनेत्रींना वेश्या म्हणून घोषित करा - त्यागी

सिनेमांत 'आयटम साँग'वर नाचणाऱ्या अभिनेत्रींविरोधात उत्तर प्रदेश हिंदू महासभेचे प्रमुख नवीन त्यागी यांच्या वक्तव्यामुळे एकच गोंधळ उडालाय.

Updated: Dec 3, 2014, 08:47 PM IST
'त्या' अभिनेत्रींना वेश्या म्हणून घोषित करा - त्यागी title=

पाटणा : सिनेमांत 'आयटम साँग'वर नाचणाऱ्या अभिनेत्रींविरोधात उत्तर प्रदेश हिंदू महासभेचे प्रमुख नवीन त्यागी यांच्या वक्तव्यामुळे एकच गोंधळ उडालाय.

छोटे कपडे घालून सिनेमांत आयटम डान्स करणाऱ्या अभिनेत्रींना वेश्या घोषित करण्याची मागणी नवीन त्यागी यांनी केलीय. अश्लील हावभाव दाखवून पैसा कमावण्याऱ्या मुली वेश्याच असतात, असंच आमचं मत आहे... हे समाजासाठी योग्य नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

इतकंच नाही तर त्यागी यांनी शाळेत आणि कॉलेजांत मुलींना स्कर्ट जीन्स घालण्यावर बंदी घालण्यात यावी, अशीही मागणी केलीय. मुलींना मोबाईल फोन ठेवण्याची परवानगीच दिली जाऊ नये, असा फतवाही काढला जावा असं त्यागींना वाटतंय.  

हा मुद्दा आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत घेऊन जाणार असल्याचं त्यागी यांनी म्हटलंय. त्यांच्या या वादग्रस्त आणि धक्कादायक वक्तव्यावर आणखी एक वाद उभा राहिलाय. 

हिंदू महासभेचे राष्ट्रीय महासचिव स्वामी चक्रपाणि यांनी मात्र त्यागींच्या या वादग्रस्त वक्तव्यापासून लांब राहणंच पसंत केलं. आपल्याला त्यागींच्या या मागणीबद्दल माहित नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच यावर नाराज झालेल्या राष्ट्रीय महिला आयोगानं त्यागी यांना जोरदार चपराक लगावलीय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.