धक्कादायक- 6 वर्षीय चिमुरडीवर शाळेत गँगरेप

अतिशय धक्कादायक प्रकार बंगळुरूत घडलाय. एका सहा वर्षीय चिमुरडीवर तिच्या नामवंत शाळेत गँगरेप झाल्याची घटना पूर्व बंगळुरूत घडलीय. 

Updated: Jul 17, 2014, 04:27 PM IST
धक्कादायक- 6 वर्षीय चिमुरडीवर शाळेत गँगरेप  title=

बंगळुरू: अतिशय धक्कादायक प्रकार बंगळुरूत घडलाय. एका सहा वर्षीय चिमुरडीवर तिच्या नामवंत विबग्योर शाळेत गँगरेप झाल्याची घटना पूर्व बंगळुरूत घडलीय. 

याविरोधात विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेबाहेर निदर्शनं केलीत. मात्र शाळा प्रशासन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतेय. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा प्रशासन प्रकरण दाबू पाहतंय आणि त्यांनी घडलेला प्रकार मुलीच्या पालकांना कळवलाही नाही. 2 जुलैला ही घटना घडली. 

पालकांनी सांगितलं की, मुलीला बरं वाटत नव्हतं तिची परिस्थिती वाईट दिसली म्हणून जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, तेव्हा हा प्रकार पालकांसमोर आला. 

प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या वर्गात शिकणाऱ्या या चिमुकलीवर शाळेतील दोन कर्मचाऱ्यांकडून शाळेच्या वेळेतच गँगरेप करण्यात आला. त्यातील एक जीम इन्स्ट्रक्टर आणि एक सिक्युरिटी गार्ड आहे. 

चिमुकलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  याप्रकरणी शाळेच्या प्रिन्सिपलनं ही दुर्दैवी घटना असून संबंधितांना शिक्षा होईल, असं म्हटलंय. शाळेबाहेर पालकांनी केलेल्या धरणं आंदोलनानंतर प्रिन्सिपलनं बाहेर निदर्शनं करू नका, आम्ही तुम्हाला इमेल आयडी देतो, त्यावर आपलं म्हणणं मांडा असं सांगितल्याचं कळतंय.

शाळेतून या दोन्ही आरोपी कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.