चालत्या मेट्रोचा दरवाजा उघडला अन्…

आता दिल्ली मेट्रोसंदर्भातली एक धक्कादायक बातमी... दिल्ली मेट्रोची बेपर्वाई आज 2000 निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतणार होती.

Updated: Jul 17, 2014, 06:38 PM IST
चालत्या मेट्रोचा दरवाजा उघडला अन्… title=

नवी दिल्ली : आता दिल्ली मेट्रोसंदर्भातली एक धक्कादायक बातमी... दिल्ली मेट्रोची बेपर्वाई आज 2000 निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतणार होती.

दिल्लीच्या जहांगीरपुरी येथून गुडगांवच्या हुडा सिटी सेंटरकडे मेट्रो निघाली मात्र अर्जनगढ आणि घिटोरनी स्टेशनदरम्यान या गाडीचा दरवाजा तब्बल सव्वा मिनिटांपर्यंत उघडाच होता. यामुळे गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. या गाडीतून तब्बल 2000 प्रवासी प्रवास करत होते.

दरम्यान, या प्रकरणात ट्रेन ऑपरेटरला निलंबित करण्यात आल्याचं मेट्रो रेल्वेच्या वतीनं सांगितलं गेलंय. 

या घटनेत कोणत्याही प्रवाशाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाहीय... पण, या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत... 

-    धावत्या मेट्रोचा दरवाजा  उघडलाच कसा ?
-    दरवाजा उघडल्यावर इमर्जन्सी ब्रेक्स का नाही लागले ?
-    या बेफिकीरीसाठी दोषी कर्मचाऱ्यांवर ‘डीएसआरसी’ काय कारवाई करणार?
-    मेट्रो ट्रेन्सची वेळोवेळी देखभाल केली जाते का?

पाहा व्हिडिओ 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.