नवी दिल्ली: जर आपल्याला सिगारेटचं व्यसन आहे. पानाच्या टपरीवरून खुल्या पाकिटातून 1-2 सिगारेट विकत घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
सिगारेटच्या विक्रीवर मोदी सरकार कडक कायदा करण्याच्या तयारीत आहे. जर हा कायदा लागू झाला तर सिगारेटची खुली विक्री बंद होईल. म्हणजे यानंतर सिगारेटचं व्यसन असणाऱ्यांना दुकानातून 1-2 सिगारेट मिळणार नाही, तर त्यांना संपूर्ण पाकिट खरेदी करावं लागेल.
सध्या असलेल्या नियमांनुसार पाकिटातून काढूनही सिगारेटची विक्री केली जाते. राज्यसभेत एका लिखित प्रश्नावर उत्तर देतांना केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डांनी ही माहिती दिलीय.
काय आहे पार्श्वभूमि -
मोदी सरकार बनल्यानंतर तत्कालिन आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी तज्ज्ञांची एक समिती बनवली होती. या समितीनं सिगारेटच्या खुल्या विक्रीवर बंदी घालण्याची शिफारीश केली आहे. सोबतच सिगारेट विकत घेण्यासाठी कमितकमी वयोमर्यादा वाढवणं आणि तंबाखू उत्पादनांवरील नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना कडक शासन करण्याची शिफारिश केलीय. समितीनं नियम तोडणं हा गंभीर अपराध माणण्याची शिफारिश केलीय. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं या समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.