मोदींच्या मंत्रिमंडळातील या मंत्र्याने एअरहोस्टेसशी केला साखरपुडा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री बाबूल सुप्रियोचा नुकताच साखरपुडा झाला.  रचना शर्मा असं बाबूल सुप्रियो यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे.

Updated: Jun 13, 2016, 04:05 PM IST
मोदींच्या मंत्रिमंडळातील या मंत्र्याने एअरहोस्टेसशी केला साखरपुडा title=

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री बाबूल सुप्रियोचा नुकताच साखरपुडा झाला. रचना शर्मा असं बाबूल सुप्रियो यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे.

ती जेट एअरवेजमध्ये काम करते. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या ९ ऑगस्टला दोघेही विवाहबद्ध होतील. फ्लाईटमध्ये या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली. गेल्या दोन वर्षांपासून त्यांची लव्हस्टोरी सुरु होती. 

बाबूल सुप्रियो यांचे हे दुसरे लग्न आहे. याआधी १९९५मध्ये त्यांनी रिया यांच्याशी लग्न केले होते. त्यानंतर २००६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगीही आहे.