'पतंजली' तुपात सापडलं केमिकल आणि कलर

'नेस्ले' या कंपनीनंतर आता बाबा रामदेव फेम 'पतंजली'ही वादात अडकण्याची चिन्ह आहेत. कारण 'पतंजली'च्या देशी तुपाचा नमुना जयपूर प्रयोगशाळेत नापास झालाय. नमुना अहवालानुसार, या तुपात केमिकल आणि कलरही सापडलाय. 

Updated: Jan 13, 2016, 10:52 AM IST
'पतंजली' तुपात सापडलं केमिकल आणि कलर  title=

नवी दिल्ली : 'नेस्ले' या कंपनीनंतर आता बाबा रामदेव फेम 'पतंजली'ही वादात अडकण्याची चिन्ह आहेत. कारण 'पतंजली'च्या देशी तुपाचा नमुना जयपूर प्रयोगशाळेत नापास झालाय. नमुना अहवालानुसार, या तुपात केमिकल आणि कलरही सापडलाय. 

उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वी बाबा रामदेवांच्या तुपात फंगसही सापडला होता. याबद्दल तक्रार दाखल झाल्यानंतर उत्तराखंडच्या खाद्य सुरक्षा विभागानं पतंजली जाऊन तुपाचे काही नमुने जमा केले होते. त्यानंतर लखनऊमध्ये पतंजलीच्या तुपात केमिकल आणि कलर सापडल्याचं उघड झालं.

लखनऊच्या योगेश मिश्र यांच्या तक्रारीनंतर हे तूप लॅब टेस्टसाठी पाठवण्यात आलं होतं. हे सॅम्पल निर्धारित घटकांमध्ये फेल ठरलं. 

उल्लेखनीय म्हणजे, पतंजलीच्या आटा नुडल्समध्येही कीडे सापडल्याचं समोर आलं होतं. याशिवाय पतंजलिच्या मोहरीचं तेल, मध, बेसन आणि काळे मिरे यांसहीत इतर सहा उत्पादनं टेस्टमध्ये नापास झालेत.