www.24taas.com, गुवाहाटी
आसाम राज्यात नुकत्याच उफाळलेल्या हिंसाचाराबद्दल राज्यातील सत्तारुढ काँग्रेसचा सहयोगी पक्ष असलेल्या ‘बोडोलँड पीपल्स फ्रंट’ या पक्षाच्या एका आमदाराला अटक करण्यात आलीय.
गुरुवारी रात्री एकच्या सुमारास ‘बोडोलँड पीपल्स फ्रंट’ पक्षाचे आमदार प्रदीप ब्रह्मा ऊर्फ गारा यांना कोकराझार शहरानजीकच्या डोटोमामधील घरातून अटक करण्यात आलीय. प्रदीप ब्रह्मा यांच्याविरोधात विविध पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी सात केसेस दाखल झालेल्या आहेत. ‘बोडोलँड पीपल्स फ्रंट’ हा क्षेत्रीय स्वतंत्र जिल्ह्यातील सत्तारुढ पक्ष आहे. `हगराम मोहिलरी` हे या पक्षाचे अध्यक्ष आहे.
गिरफ्तारी आणि धुबरी या जिल्ह्यात काल घडून आलेल्या हिंसेमध्ये आणखी दोन लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. यानंतर कोकराझार जिल्ह्यात पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी कर्फ्यु लावण्यात आलाय. याविरुद्ध ब्रह्मा यांच्या समर्थकांनी रेल्वे आणि राजमार्ग काही काळासाठी रोखून धरला होता.
आसाममध्ये कोकराझार, धुबरी आणि चिरांग या जिल्ह्यांमध्ये उफाळलेल्या हिंसेत आत्तापर्यंत एकूण ८० पेक्षा जास्त लोक बळी पडलेत. तर चार लाखांपेक्षा जास्त लोक बेघर झालेत.