www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आसारामपुत्राला अखेर अटक करण्यात आलीय. सुरतमधील बलात्कारप्रकरणी नारायण साईला पंजाबमधून अटक करण्यात आलीय.
गेल्या ५८ दिवसांपासून नारायण साई पोलिसांना चकमा देत होता. पण, अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडलाच. दिल्ली आणि सुरत पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत त्याला अटक केलीय. शीखांच्या वेषभूषेमध्ये नारायण साई पंजाबमध्ये पोलिसांना सापडला. त्याच्यासोबत त्याचे सहकारी हनुमान, विष्णू, भाविका तसंच त्याचा ड्रायव्हर यांनाही पोलिसांनी अटक केलीय.
नारायण साईला आज दिल्ली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. साई याच्याविरुद्ध ६ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जाहीर केलं गेलं. त्यामुळे नारायण साईला देश सोडून जाता आलं नाही. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अडकल्यानंतर या आसाराम पुत्रावर गुजरातच्या दोन बहिनींनी बलात्कारासोबतच आणखीन गंभीर आरोप केले होते.
यानंतर कोर्टानं नारायण साईला फरार म्हणून घोषित केलं होतं. सूरतच्या दोन बहिणींतर्फे त्यांच्या वडील आणि भावानं लैंगिक शोषणाची तक्रार केल्यानंतर नारायण साई फरार झाला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.