केजरीवाल यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

आप नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणानंतर अरविंद केजरीवाल यांनी मोदींची आज सकाळी भेट घेतली.

Updated: Feb 12, 2015, 12:28 PM IST
केजरीवाल यांनी घेतली पंतप्रधानांची भेट title=

नवी दिल्ली : आप नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणानंतर अरविंद केजरीवाल यांनी मोदींची आज सकाळी भेट घेतली.

यावेळी दिल्लीला राज्याचा दर्जा देण्याची मागणी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आणि शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आमंत्रणही दिलं, अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आपचे मनीष शिसोदीया देखिल उपस्थित होते.

नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यात 10 मिनिटं चर्चा झाली. दिल्लीच्या विकासासाठी सर्वप्रकारची मदत करण्याचं आश्वासन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांना दिलं.

एकदा भेट नाकारली होती, आता आमंत्रण द्यावं लागलं.
दिल्ली राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचावर अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. पण अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून परतावं लागलं होतं. 

पूर्व परवानगी शिवाय भेटता येणार नाही असं कारण सांगण्यात आलं होतं. पण दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर, नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना अभिनंदनासाठी फोन केला आणि 'चाय पे चर्चा' करू या असं सांगत भेटीचं निमंत्रणंही दिलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.