दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोडणार खुर्ची

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या पदाच्या खुर्चीचा त्याग करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांच्याकडे केजरीवाल सूत्रे सोपविण्याची शक्यता आहे.

Updated: Dec 11, 2015, 05:32 PM IST
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोडणार खुर्ची  title=

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या पदाच्या खुर्चीचा त्याग करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांच्याकडे केजरीवाल सूत्रे सोपविण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये 'आप'ची पाळेमुळे रुजविण्यासाठी अरविंद केजरीवाल जातीने लक्ष घालण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये आपचे चार खासदार निवडणून आले आहेत. त्यामुळे पक्षाला चांगले स्थान आहे. आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी केजरीवाल आपले विश्वासू सहकारी मनिष सिसोदीया यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपविण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पंजाबमध्ये २०१७ला विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्लीत घवघवीत यश मिळविल्याने पक्षाचा विश्वास दुणावलाय. त्यामुळे पंजाब जिंकण्यासाठी आणि निवडणुकीची तयारी करण्यासाठी केजरीवाल पदाचा त्याग करु शकतात. १४ जानेवारी २०१६ रोजी पंजाबमध्ये केजरीवाल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह रॅली काढणार आहेत. त्यावेळी ते रॅलीला संबोधित करणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.