खुशखबर : पाणी मोफत, वीज दर अर्ध्यावर; सरकारचा निर्णय

दिल्लीत 'आम आदमी पार्टी' सत्ता हातात घेतल्यानंतर अवघ्या ११ व्या दिवशी सगळ्याच दिल्लीकरांसाठी एक खुशखबर दिलीय. आपल्या वचनांची पूर्ती करणारा केजरीवाल सरकारचा हा निर्णय निश्चितच धाडसी म्हणावा लागतोय. 

Updated: Feb 25, 2015, 06:11 PM IST
खुशखबर : पाणी मोफत, वीज दर अर्ध्यावर; सरकारचा निर्णय title=

नवी दिल्ली : दिल्लीत 'आम आदमी पार्टी' सत्ता हातात घेतल्यानंतर अवघ्या ११ व्या दिवशी सगळ्याच दिल्लीकरांसाठी एक खुशखबर दिलीय. आपल्या वचनांची पूर्ती करणारा केजरीवाल सरकारचा हा निर्णय निश्चितच धाडसी म्हणावा लागतोय. 
 
जनतेचा हक्क सांगत केजरीवाल सरकारनं वीज दर निम्मे करण्याची घोषणा केलीय. तसंच दिल्लीकरांना आता पाणीही मोफत मिळणार आहे. घटलेले दर, येत्या काही दिवसांत म्हणजेच, १ मार्च २०१५ पासून लागू होणार आहेत. 

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या वचनांची पूर्ती करत सरकारचे हे निर्णय जाहीर करत असल्याचं म्हटलंय. सध्या, जे लोक ४०० युनिटपर्यंत वीज वापरत असतील त्यांच्या बीलात ५० टक्क्यांपर्यंत घट होणार आहे. परंतु, ४०० युनिटहून जास्त वीज वापरणाऱ्यांना मात्र जुन्याच दरानं बील भरावं लागेल. यासोबतच, सिसोदिया यांनी दिल्लीकरांना वीजेचा वापर करताना सावधानता बाळगण्याची विनंती केलीय. त्यामुळे सहजच वीजेचे दर अर्ध्याहून कमी करण्यास मदत मिळेल.

दर महिन्याला २० हजार लीटर पाणी वापरणाऱ्या उपभोक्त्यांना पाणी मोफत मिळणार आहे. पण, २० हजार लीटरपेक्षा जास्त पाणी वारल्यास मात्र संपूर्ण बील भरावं लागेल.  
 
आम्ही जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करत असल्याचं सिसोदिया यांनी म्हटलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार, १ मार्च ते ३१ मार्चपर्यंत दर अर्धे करण्यासाठी ७० करोड रुपयांचा खर्च होणार आहे. सबसिडी कॅग ऑडिट पूर्ण होईपर्यंत लोकांना या योजनेचा फायदा मिळेल. यासाठी सरकारला १४२७ करोड रुपयांची गरज लागणार आहे. तसंच मोफत पाण्याचा फायदा १८ लाख कुटुंबीयांना उपलब्ध होईल आणि त्यासाठी सरकारल जवळपास २० करोड रुपये प्रती महिना अतिरिक्त खर्च उचलावा लागेल. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.