अरविंद केजरीवाल यांना कुर्ला कोर्टाचा दिलासा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुंबईच्या कुर्ला कोर्टाने दिलासा दिलाय. प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याची गरज नसल्याचं सांगत कोर्टानं केजरीवाल यांना दिलासा दिलाय.

Updated: Jan 20, 2016, 09:40 PM IST
अरविंद केजरीवाल यांना कुर्ला कोर्टाचा दिलासा title=

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुंबईच्या कुर्ला कोर्टाने दिलासा दिलाय. प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याची गरज नसल्याचं सांगत कोर्टानं केजरीवाल यांना दिलासा दिलाय.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर अरविंद केजरीवाल हे आपली बाजू मांडण्याकरता कुर्ला कोर्टात हजर झाले. न्यायाधीश रिचा खेडेकर यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. यावेळी आपचे कार्यकर्ते सतीश जैन यांनी केजरीवाल यांच्यासाठी शुअरीटी दिली. त्यानंतर १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोर्टानं त्यांना जामीन दिलाय. 

गेल्या वर्षी मार्च महिन्यात मानखुर्द भागात आम आदमी पार्टीनं कोणतीही पूर्व परवानगी न घेता एक जाहीर सभा घेतली होती. याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात एफआईआर दाखल करण्यात आली होती.