लखनऊ : समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांनी महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पडदा पद्धत बंद करण्याचं आवाहन जनतेला केलंय.
पडदा पद्धती ही गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेली कुप्रथा आहे... अशा संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्यांना तुरुंगात टाकायला हवं... असं आवाहन मुलायम सिंह यादव यांनी केलंय. एसपी महिला विंगच्या राष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते.
‘आम्ही नेहमीच पडदा पद्धतीचा विरोध केलाय. मी जेव्हा कधी एखाद्या गावात जेवण्यासाठी जातो... तिथं तिथं महिलांना पडद्यामागे न राहण्याची विनंती करतो. त्यानंतरच मी त्या घरी जेवतो...’ असंही मुलायम सिंह यांनी म्हटलंय.
द्रौपदी आणि सावित्रीला तर कधीही पडद्याची गरज लागली नाही, असंही म्हणत पुराणांचा दाखलाही त्यांनी यावेळी दिलाय.
आज महिला सर्वच क्षेत्रांत पुढे वाटचाल करत आहेत... आता, हे तर लोकांच्या विचारावर अवलंबून आहे की त्यांना पडदा पद्धत बंद करायचीय किंवा नाही... आपण सर्वांनी महिलांना बरोबरीचे अधिकार द्यायलाच हवेत, असं म्हणत मुलायम सिंह यांनी महिलाच्या स्वातंत्र्यांचा आणि अधिकारांचा मुद्दा उचललाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.