नवी दिल्ली : तुम्ही भारतीय लष्करात प्रवेश करण्याची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
भारतीय लष्करात प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. १ सप्टेंबरपासून लष्करातील भरती प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे भरतीसाठी आता ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.
अधिक वाचा : नोकरी : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी
आता उमेदवारांना लष्करात भरतीचा अर्ज घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. भरतीची प्रक्रिया ऑनलाइन अर्ज केल्यानंतर लष्करातर्फे तारीख आणि चाचणीची माहिती सांगण्यात येईल.
ऑनलाइन प्रक्रियेने उमेदवारांचा मोठ्याप्रमाणात वेळ वाचणार आहे. लष्करात भरतीसाठी इच्छूक उमेदवारांनी www. joinindianarmy.nic.in वर स्वतःच्या नावाची नोंदणी करू शकतात. ही वेबसाईट २४ तास काम करणार आहे. त्यामुळे उमेदवार कोणत्याही वेळी अर्ज करू शकतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.