'पाकिस्ताननं शांतीचा भंग केल्यास तोडीसतोड उत्तर दिलं जाईल'

भारतीय लष्कराचा 69 वा लष्कर दिन आज साजरा होत आहे. या निमित्तानं तिन्ही दलांच्या प्रमुखांनी, अमर जवान ज्योतीला मानवंदना देत, पुषपचक्र अर्पण केलं. त्यानंतर विविध कारवायांमध्ये शौर्य बजावलेल्या अधिकारी आणि जवानांना शौर्य पदकानं गौरवण्यात आलं.

Updated: Jan 15, 2017, 07:25 PM IST
'पाकिस्ताननं शांतीचा भंग केल्यास तोडीसतोड उत्तर दिलं जाईल' title=

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचा 69 वा लष्कर दिन आज साजरा होत आहे. या निमित्तानं तिन्ही दलांच्या प्रमुखांनी, अमर जवान ज्योतीला मानवंदना देत, पुषपचक्र अर्पण केलं. त्यानंतर विविध कारवायांमध्ये शौर्य बजावलेल्या अधिकारी आणि जवानांना शौर्य पदकानं गौरवण्यात आलं.

दरम्यान पाकिस्ताननं शांतीचा भंग केल्यास तोडीसतोड उत्तर दिलं जाईल असा इशारा, यावेळी बोलताना लष्करप्रमुख बिपीनचंद्र रावत यांनी दिला.