नवी दिल्ली : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिला यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अपोलो रुग्णालयाने दिलीये.
जयललिता ईसीएमओ आणि लाईफ सपोर्टवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असे अपोलो रुग्णालयाने काढलेल्या पत्रकात म्हटलेय. जयललिता यांना काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला.
जयललिला यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त समजताच, त्यांच्या असंख्य चाहत्यांनी रात्रीपासूनच अपोलो रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी केलीय. जयललितांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी, त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.
जयललिता यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी देशभरात त्यांचे चाहते प्रार्थना आणि पूजाअर्चना करत आहेत. मुंबईतल्या धारावीमध्येही जयललिता यांच्या प्रकृती सुधारासाठी नागरिकांनी देवाला साकडं घालण्यात आलंय.
Apollo Hospital Spokesperson says CM #jayalalithaa remains very critical &is on ECMO and other life support systems, being closely observed.
— ANI (@ANI_news) December 5, 2016