दिल्ली, केरळनंतर आता गुजरातमध्ये मॅगीचे नमुने तपासणीसाठी

दिल्लीमध्ये मॅगीचे १३ पैकी १० नमुने सदोष आढळल्यानंतर, आता तबब्ल ३९ नमुने गुजरातमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. गुजरातमधल्या अहमदाबाद, बडोदा, सुरत आणि राजकोट इथं मॅगीचे हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. 

Updated: Jun 3, 2015, 03:46 PM IST
दिल्ली, केरळनंतर आता गुजरातमध्ये मॅगीचे नमुने तपासणीसाठी title=

अहमदाबाद: दिल्लीमध्ये मॅगीचे १३ पैकी १० नमुने सदोष आढळल्यानंतर, आता तबब्ल ३९ नमुने गुजरातमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. गुजरातमधल्या अहमदाबाद, बडोदा, सुरत आणि राजकोट इथं मॅगीचे हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. 

या आठवड्याच्या शेवटी या नमुन्यांचे अहवाल समोर येतील. उत्तर प्रदेशबरोबरच दिल्लीमध्येही मॅगी हानिकारक असल्याचं स्पष्ट झालंय. तर केरळमध्ये याआधीच मॅगीवर बंदी घालण्यात आली आहे. 
 
तर दुसरीकडे भारतात नेस्ले कंपनीच्या मॅगीवरुन वाद निर्माण झाला असताना, शेजारच्या बांग्लादेशात मात्र नेस्लेच्या मॅगीला हिरवा कंदिल मिळाला आहे. नेस्ले मॅगीमध्ये कोणतेही हानीकारक घटक सापडले नसल्याचा खुलासा, बांगलादेश स्टँडर्ड्स अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूटनं केला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.