अमृतसरमध्ये जन्माला आलंय 'प्लॅस्टिक बेबी'

तुम्ही आजवर 'प्लॅस्टिक बेबी'बद्दल अनेकदा ऐकलं असेल. मात्र अमृतसरमध्ये अशाच एका मुलगी जन्माला आली आहे. डॉक्टर ती 'प्लॅस्टिक बेबी' असल्याचं सांगत आहे. या अनोख्या मुलीची त्वचा रबरासारखी आहे. 

Updated: May 12, 2015, 04:28 PM IST
अमृतसरमध्ये जन्माला आलंय 'प्लॅस्टिक बेबी' title=

अमृतसर: तुम्ही आजवर 'प्लॅस्टिक बेबी'बद्दल अनेकदा ऐकलं असेल. मात्र, अमृतसरमध्ये अशीच एक मुलगी जन्माला आली आहे. हे बाळ 'प्लॅस्टिक बेबी' असल्याचं  डॉक्टर सांगत आहे. कारण, या अनोख्या मुलीची त्वचा रबरासारखी आहे. 

गुरू नानक देव मेडिकल हॉस्पिटलचे बाल चिकित्सक डॉ. एम एस पन्नू यांनी प्लॅस्टिक बेबीच्या जन्माची पुष्टी केली आहे. अशा बालकांना वैज्ञानिक भाषेत 'कोलोडियन बेबी' म्हटलं जातं. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ही छोटी मुलगी रबराच्या बाहुलीसारखी आहे. तिचा चेहरा माशासारखा आहे. तिला कोणी स्पर्श केल्यास लगेत ती रडते. या मुलीचे डोळे आणि ओठ पूर्णपणे लाल आहेत. 

डॉक्टरांच्या मते, सहा लाख मुलांमध्ये अपवादात्मकरित्या असं एखादं बाळ जन्माला येतं. हा एक अनुवंशिक आजार असल्याचंही डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.