राहुल गांधींनंतर... अमित शाहदेखील दलितांच्या दारात!

दलितांच्या घरी भोजन करून आपल्या मतपेटीत भर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधींवर भाजपकडून टीका करण्यात आली होती. आता मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीदेखील राहुल गांधींची री ओढलीय. 

Updated: May 31, 2016, 10:20 PM IST
राहुल गांधींनंतर... अमित शाहदेखील दलितांच्या दारात! title=

वाराणसी : दलितांच्या घरी भोजन करून आपल्या मतपेटीत भर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधींवर भाजपकडून टीका करण्यात आली होती. आता मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीदेखील राहुल गांधींची री ओढलीय. 

अमित शाह यांनीही मंगळवारी वाराणसीतल्या एका दलित घरी जेवण केलंय. सेवापुरी विधानसभेच्या जोगियापूर गावात राहणाऱ्या गिरजा प्रसाद बिद आणि अकबाल नारायण बिद यांच्या कुटुंबात त्यांनी आपलं दुपारचं जेवण घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आणखीन काही नेतेही हजर होते. 
  
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीआधी दलित आणि अतिमागासवर्गींयांना आपल्या बाजुनं करण्याचा हा भाजपचा फॉर्म्युला मानला जातोय. पण, जनता सब जानती है...!