अमित शाह आणि नारायण राणे यांची अहमदाबादमध्ये भेट

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची येथे भेट झाली. त्यामुळे राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे. दरम्यान, ही भेट वेगळ्या कारणाने होती, असे राणेंच्या सूत्रांकडून माहिती सांगण्यात येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 13, 2017, 09:14 AM IST
अमित शाह आणि नारायण राणे यांची अहमदाबादमध्ये भेट  title=

अहमदाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची येथे भेट झाली. त्यामुळे राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे. दरम्यान, ही भेट वेगळ्या कारणाने होती, असे राणेंच्या सूत्रांकडून माहिती सांगण्यात येत आहे.

अमित शाह हे आजोबा झाल्याने राणेंनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ही सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अमित शाह आणि राणे यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, भेटीत काय झाले हे समजले नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांची एकत्र भेट झालेली नाही. दोन्ही भेटी या वेगवगळ्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत दीड तास चर्चा झाली. या भेटीमागचा उद्देश आणि यावेळी काय चर्चा याबाबत मात्र तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत अमित शाह यांची भेट घेणार होते. मात्र, शाह हे घरगुती कारणामुळे अहमदाबादमध्ये असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहेत. राणेंच्या ६५ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नारायण राणेंचे चिरंजीव नीलेश राणे हे सातत्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर सोशल मीडियावरून टीका करत आहेत. यासगळ्या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.