www.24taas.com , झी मीडिया, देहरादून
कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिरात आज ८६ दिवसांनंतर पूजा करण्यात आलीय. सकाळी ७ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर शुद्धिकरण पूजा करण्यात आली.
सकाळी 8 नंतर विधिवत पूजा मांडण्यात आली असून पुजेत मंदिराचे मुख्य पुजारी रावल भीम शंकर लिंग शिवाचार्य यांच्या बरोबर उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा आणि मंत्री हरक सिंह रावतही उपस्थित होते.
उत्तराखंडात आलेल्या महाप्रलयानंतर तब्बल ८६ दिवसांनी मंदिरात पूजा मांडण्यात आलीय. केदारनाथ-बद्रिनाथ कमिटी आणि प्रशासनाच्या पुढाकारानं पूजा सुरु झाली. बम-बम भोले, जय केदारनाथच्या जयघोषांनी केदारनाथ मंदिराचा आसमंत पुन्हा एकदा दुमदुमून गेला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.