कोलकातामध्ये विकली जातायत बनावट अंडी

कोलकाता नगरपालिकेने शहरांमध्ये विकल्या जाणाऱ्या कृत्रिम अंड्यांच्या विक्रीच्या चौकशीचे आदेश दिलेत. केएमसीच्या महापौरांनी गुरुवारी ही माहिती दिलीये. 

Updated: Mar 31, 2017, 12:19 PM IST
कोलकातामध्ये विकली जातायत बनावट अंडी title=

नवी दिल्ली : कोलकाता महानगरपालिकेने शहरांमध्ये विकल्या जाणाऱ्या कृत्रिम अंड्यांच्या विक्रीच्या चौकशीचे आदेश दिलेत. केएमसीच्या महापौरांनी गुरुवारी ही माहिती दिलीये. 

अनिता कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर कृत्रिम अंड्याच्या विक्रीच्या चौकशीचे आदेश महापौरांनी दिलेत. केएमसीचे महापौर सोवन चॅटर्जी यांनी दिेलेल्या माहितीनुसार, कोलकातामधील तिलजला बाजारात मोठ्या प्रमाणात कृत्रिम अंडी विकत असल्याची माहिती मिळालीये. प्लास्टिक अंडी विकत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर त्यांनीही याबाबत पोलिसांना माहिती दिलीये. 

तक्रार दाखल केलेल्या अनीता कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट अंडे तव्यावर टाकल्यानंतर विचित्र पद्धतीने प्लास्टिकप्रमाणे तव्यावर पसरले. यावेळी अनीता यांना संशय आला त्यामुळे अंडे आगीच्या जवळ नेल्यास पटकन आग लागली. 

त्यामुळेच अनीता यांचा विश्वास बसला की ही खरी अंडी नाहीयेत. त्यानंतर याप्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली.