www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हेच एअर इंडियाला डबघाईत लोटण्यास कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आलाय. इंडियन एरलाईन्सचे माजी प्रमुख सुनील अरोरा यांनी हा गौप्यस्फोट केलाय. २००५ मध्ये कॅबिनेट सचिवांना त्यांनी लिहिलेल्या पत्रामुळं पटेल पुन्हा एकदा अडचणीत सापडलेत.
नागरी उड्डाणमंत्रीपदी असताना प्रफुल्ल पटेल यांनी दबाव आणून अनेक अयोग्य निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा उल्लेख या पत्रामध्ये आहे. विमानातील आसन व्यवस्था बदलण्यास भाग पाडणे, उन्हाळ्याच्या ऐवजी हिवाळ्यात विमानांच्या फेऱ्या वाढवण्यासारखे आश्चर्यकारक निर्णय घेण्यास पटेल यांनी भाग पाडल्याचा आरोपही यात करण्यात आलाय. २००४ मध्ये पटेल हेच मंत्रीपदी असताना केवळ १८ विमानांची गरज असताना आश्चर्यकारकरित्या तब्बल ६८ विमानांची खरेदी करण्यात आली. यामध्ये एअर इंडियावर कोट्यवधी रुपयांचा कर्जाजा बोजा पडला.
दरम्यान, अरोरांच्या आरोपांची चौकशी करावी अशी मागणी माकपचे खासदार प्रबोध पांडा आणि भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांनी केंद्रीय दक्षता आयोगाकडे केलीय.