हिरे व्यापाऱ्यानं ६००० करोड रुपये बँकेत केले जमा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर काळा पैसाधारक चांगलेच चपापलेत. या घोषणेनंतर गुजरातच्या एका हिरा व्यापाऱ्यानं आपले ६००० करोड रुपये सरकारसमोर सादर केलेत. 

Updated: Nov 15, 2016, 10:43 AM IST
हिरे व्यापाऱ्यानं ६००० करोड रुपये बँकेत केले जमा  title=

सूरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर काळा पैसाधारक चांगलेच चपापलेत. या घोषणेनंतर गुजरातच्या एका हिरा व्यापाऱ्यानं आपले ६००० करोड रुपये सरकारसमोर सादर केलेत. 

११ नोव्हेंबर रोजी गुजरातचे व्यापारी लालजी  पटेल यांनी आपल्या खात्यात तब्बल ६००० करोड रुपये जमा केले... शिवाय, २०० टक्क्यांच्या हिशोबानं टॅक्स आणि दंडाच्या स्वरुपात त्यांनी ५४०० करोड रुपयेही जमा केलेत.

या ५४०० करोड रुपयांच्या टॅक्समध्ये १८०० करोड रुपयांचा इन्कम टॅक्स त्यांनी भरलाय. तर उरलेले ३६०० करोड रुपये टॅक्सवर दंडाच्या स्वरुपात त्यांना भरावा लागलाय. 

उल्लेखनीय म्हणजे, लालजी पटेल हे तेच व्यापारी आहेत ज्यांनी बोनस म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना फ्लॅट आणि कार वाटल्या होत्या. तसंच त्यांनी ४.३१ करोड रुपये देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूट विकत घेतला होता. लालजी पटेल हे मोदींचे समर्थक मानले जातात. 

'बेटी पढाओ' अभियानांतर्गत पटेल यांनी देशातील १०,००० मुलींच्या शिक्षणासाठी २०० करोड रुपये दान केले होते.