नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्यानं लालकृष्ण अडवाणी यांनी आनंद व्यक्त केलाय.
मोदी यांची ‘उत्स्फूर्त’ पाकिस्तान भेट म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याच पावलावर पाऊल असल्याच्ंही अडवाणींनी म्हटलंय. पंतप्रधानांसह सरकारमधील सर्वच नेत्यांनी वाजपेयी यांच्या प्रयत्नांना वेग द्यावा असंही अडवाणींनी सुचवलंय.दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होत नाहीत तोवर दहशतवादाच्या प्रश्नावर निर्णायक तोडगा निघणे शक्य नसल्याचं अडवाणींनी म्हटलंय.
अफगाणिस्तान दौऱ्यावरुन परतत असताना मोदींनी लाहोरमध्ये जात नवाझ शरीफ यांची अचानक भेट घेतली होती. यावेळी त्यांनी नवाज शरीफांना वाढदिवाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. यापूर्वी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी १९९९मध्ये लाहोरमध्ये गेले होते.