सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी 3 पत्रकारांचीही चौकशी

माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी 3 पत्रकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पुष्कर यांनी मुत्यूपूर्वी तीन पत्रकारांना संपर्क केला असल्याचं सांगण्यात येतंय, पत्रकारांकडून तपासाचे काही धागेदोरे मिळतात का, यासाठी पोलिसांचा हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Jan 22, 2015, 09:05 PM IST
सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी 3 पत्रकारांचीही चौकशी title=

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी 3 पत्रकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पुष्कर यांनी मुत्यूपूर्वी तीन पत्रकारांना संपर्क केला असल्याचं सांगण्यात येतंय, पत्रकारांकडून तपासाचे काही धागेदोरे मिळतात का, यासाठी पोलिसांचा हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे.

 सुनंदा पुष्कर या मागील वर्षी त्यांच्या मृत्युपूर्वी काही तास आधी ज्या पत्रकारांशी बोलल्या होत्या, त्या पत्रकारांची चौकशी दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सुरू केली आहे. 

किस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी शशी थरूर यांचे प्रेमसंबंध असल्याचा सुनंदा पुष्कर यांना संशय होता, असे पत्रकारांनी सांगितले. तसेच, 'आयपीएलच्या वादामध्ये थऱूर यांच्यासाठी मी टीका सहन केली,' असेही त्यांनी पोलिसांना सांगितले. दोन महिला आणि एका पुरुष पत्रकाराला पोलिसांच्या विशेष तपास पथकाने संपर्क साधला होता. त्यावेळी वरील माहिती मिळाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

पुष्कर यांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या विविध घटनांचा क्रम आणि संदर्भ लावण्यासाठी पोलिस संबंधित पत्रकारांची चौकशी करीत आहेत. सुनंदा यांनी त्यांच्याशी बोलताना आयपीएल वादंगाबाबत किंवा त्यांचे पती शशी थरूर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी असलेल्या कथित संबंधांबाबत काही उल्लेख केले का याची चौकशी पोलिस करीत आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.