नवी दिल्ली : अपघातग्रस्तांना मदत करताना आता पोलिसांच्या चौकशीच्या ससेमीऱ्याची चिंता करण्याची गरज नाही. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची पोलीस चौकशी नको, असे स्पष्ट आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.
सर्वोच्च न्यायालयाने अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची नावे विचारू नयेत, या सरकारच्या निर्देशाना हिरवा कंदिल दिलाय. त्यामुळे जीव वाचवणाऱ्यांना आता पोलिसी चौकशीसाठी फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची पोलीस चौकशी नको, या नव्या निर्देशांना जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.